पॅराडाईज गावरान

पॅराडाईज गावरान

मुळात हा व्यवसाय मुक्त गोठ्या मधेच गायी-म्हैशी सोबत केला जाऊ शकतो, त्या साठी वेगळे काही करायची गरज नाही. देशी किंवा गावरान क्रॉस जाती ह्या अतिशय काटक अणि उत्तम रोगप्रतिकार क्षम असतात.कुक्कुट पालन करत असताना जातीची निवड ही तुम्ही कोणत्या मार्केट साठी व्यवसाय करू इच्छिता यावर अवलंबून आहे .

मुख्य करून अंडी आणि मांस उत्पादन हे दुहेरी उद्दिष्ट अनेक लोकांचे असते. अशाच प्रकारची दुहेरी उद्दिष्ट पूर्ण करणारी जात म्हणजे पॅराडाईज गावरान.


आपल्या देशामध्ये कोंबडीपालन हा व्यवसाय मोठय़ा शहरांपर्यंतच मर्यादित राहिला आहे. त्यामुळे ग्रामीण व आदिवासी भागामध्ये लोकांना मांसयुक्त व अंडीयुक्त आहाराची कमतरता आहे. त्यामुळे ग्रामीण भागात अंडी व कोंबडयांचे मांस जास्त पैसे देऊन विकत घ्यावे लागते. आपल्या देशातील पारंपरिक आहारामध्ये पौष्टिक तत्वे कमी असतात आणि प्रथिने यांचे प्रमाण कमी आहे.

म्हणून ग्रामीण जनता पूरक आहार बिन्स व डाळयुक्त आहारावर अवंलबून असते. अशारितीने ग्रामीण जनता प्रोटीनयुक्त आहारापासून वंचित राहत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात अनेक प्रकारचे रोग, कुपोषणाचा प्रश्न भेडसावत आहे. याचा प्रभाव विशेषकरून गर्भवती, स्तनपान करणा-या मातांमध्ये तसेच लहान मुलांमध्ये दिसून येतो.


यासाठी आपल्या देशात अधिक प्रतीकार शक्ती असलेल्या व ग्रामीण क्षेत्रामध्ये अधिक टिकाऊपणे राहतील अशा विविध रंगांतील जाती विकसित करून त्यावरती संशोधन चालू आहे.


अशाच प्रकारची एक जात म्हणजे पॅराडाईज गावरान या जातीमधील नरपक्षी १० ते १२ आठवडयांत जास्तीत जास्त वजन देतात, त्याचप्रकारे मादी पक्षीसुद्धा १६० ते १८० अंडी प्रतिवर्षी देतात. ग्रामीण क्षेत्रात उपलब्ध असणा-या वनस्पती व पूरक खाद्यावरती ही जात उत्तम प्रकारे वाढू शकते.


ग्रामीण भागात कोंबडी पालन व्यवसायाच्या विकासावर सरकार भर देत आहे. वास्तविक पाहता शहरामध्ये अंडी व मातांची उपलब्धता चांगली असूनसुद्धा ग्रामीण क्षेत्रातून उत्पादित केलेल्या अंडयांना व कोंबडयांना अधिक चांगल्या दराने मागणी येते.




Send a Message

An email will be sent to the owner