हॅचिंग एग

हॅचिंग एग

हॅचिंग एग म्हणजे काय ?


प्रथम कोंबडी की अंडी?

अंडी शाकाहारी आहे की मांसाहार आहे ?  

जर कोंबडी अंडी देते तर ते शाकाहारी किंवा मांसाहारी? हे असे काही प्रश्न आहेत ज्यांचे उत्तर प्रत्येकास जाणून घ्यायचे आहे. जगभरातील लोकांचे याबद्दल भिन्न मत आहे. काहीजण म्हणतात की गायीचे दूध शाकाहारी आहे, त्याचप्रमाणे कोंबडीचे अंडेही शाकाहारी असतात. दुसरीकडे, अंडी मांसाहारी म्हणून संबोधणारे लोक असा तर्क करतात की कोंबडी अंड्यातून बाहेर आली म्हणून ती मांसाहारी आहे. पण याचे उत्तर शोधून वैज्ञानिकांनी या चर्चेला आळा घातला आहे. या विषयावर वैज्ञानिक काय म्हणतात ते जाणून घेऊया ...

त्याचप्रमाणे हॅचिंग एग म्हणजे काय हे सुद्धा आपण जाणून घेऊ.


आहारात अंड्याला फार महत्त्व आहे. कारण त्यात अनेक पोषण द्रव्ये असतात. अंडी खाण्याची प्रथा आपल्याकडे ही प्रथा रूढ नसतानाच्या काळात अंड्याचे महत्त्व सांगण्याचा आणि त्याचा प्रचार करण्याचा प्रयत्न सरकारने केला. अंडी खाल्ल्याने माणूस शक्तीमान होतो कारण अंड्यात जीवनसत्त्वे विशेषत: जीवनसत्तव ड हे मोठ्या प्रमाणावर असते. लहान मुलांना अंडी खायला दिली पाहिजेत कारण त्यामुळे मुलांचे शरीर बळकट होते. मुले शक्तीमान होतात. म्हणूनच म्हटले जाते, जो खाई अंडे,त्याशी कोण भांडे ?.अंडी खाणार्‍याशी भांडण्याची हिंमत कोणी करू शकणार नाही. असे असले तरीही अंडी हा मांसाहारी प्रकार आहे त्यामुळे शाकाहारी लोक अंडी खात नाहीत. नाही म्हटले तरी भारतात शाकाहारी लोकांचीच संख्या मोठी आहे. त्यामुळे अंड्यांच्या वापराला काही मर्यादा येतात. शाकाहारी लोकांनी अंडी खायला सुरूवात केली तर मात्र अंड्यांना मोठी मागणी येईल आणि अंड्याची किंमत वाढून कोंबडी पालकांना याचा फायदा होईल. शाकाहारी लोकांनीही अंडी खावीत यासाठी अंडी ही शाकाहारी असतात हे सांगण्याचा फार प्रयत्न झाला पण काही शाकाहारी संघटना आणि काही साधूंंनी शाकाहारी अंडे या संकल्पनेलाच विरोध केला आणि अंडी शाकाहारी असू शकत नाहीत असे सांगायला सुरूवात केली. त्यामुळे शाकाहारी अंडी ही संकल्पना लोकांपर्यंत नीट पोचली नाही.


जीवशास्त्राचा विचार केला किंवा अगदी कॉमन सेन्सने विचार केला तरीही अंडी शाकाहारी असू शकतात हे पटेल. मोकाट पद्धतीने पाळल्या जाणार्‍या गावठी कोंबड्यांची अंडी मांसाहारी असतात पण पिंजर्‍यात पाळल्या जाणार्‍या कोंबड्यांची अंडी मात्र शाकाहारी असतात. हे नीट समजून घेतले पाहिजे. पिंजर्‍यात कोंबड्या पाळण्याच्या पद्धतीत केवळ कोंबडीच पाळली जाते. त्या पिंजर्‍यात एकही कोंबडा नसतो. त्यामुळे पिंजर्‍यातल्या कोंबड्या जी अंडी घालतात त्या अंड्यांत जीव नसतो. कारण तिथे नर माणि मादी यांचा संयोग झालेला नसतो. अशा कोंबड्यांची अंडी कितीही उबवली तरी त्यांच्यातून पिल्लू बाहेर पडत नाही. त्या अंड्यात जीव नसल्यामुळे ती शाकाहारी असतात. मात्र त्यात जीव तयार होण्यासाठी आवश्यक तो आहार भरलेला असतो. कोंबडीच्या अंड्यातून पिल्लू बाहेर पडणार असेल तर त्याला २१ दिवस लागतात. तेवढे दिवस तो जीव कोंबडीच्या शरीराबाहेर जगणार असतेा आणि अंड्यातून बाहेर पडे पर्यंत त्याची गुजराण या अंंड्यातल्या अन्नावर होणार असते. त्यामुळे कोंबडीमध्ये ती गुजराण होण्यास आवश्यक तेवढे पोषक अन्न अंड्यात तयार ठेवण्याची प्रवृत्ती कोंबडीत असते.


आमच्याकडे पॅराडाईज गावरान, कडकनाथ व बेटर यांचे हॅचिंग एग मिळेल.



Send a Message

An email will be sent to the owner