About Us

पॅराडाईज पोल्ट्री फार्म

  पॅराडाईज पोल्ट्री फार्म अमरावती जिल्ह्यातील एक नामवंत पोल्ट्री फार्म आहे. आम्ही २५ सप्टेंबर २०१९ पासून पोल्ट्री क्षेत्रात काम करत आहे. लोकांना योग्य भावात उत्कृष्ट गुणवत्तेचे पोल्ट्री प्रॉडक्ट उपलब्ध करून देणे हेच आमचे ध्येय आहे.तसेच नवीन पोल्ट्री व्यवसाय करू इच्छिणाऱ्या उद्योजकांना पॅराडाईस पोल्ट्री फार्म योग्य ती मार्गदर्शन करते. पॅराडाईज पोल्ट्री फार्म च्या मार्गदर्शनाखाली विदर्भात एका वर्षात नवीन 15 उद्योजकांनी स्वतःचे छोटे व मोठे पोल्ट्री व्यवसाय चालू केलेला आहे. भविष्यात हजारो सुशिक्षित बेरोजगारांना पोल्ट्री व्यवसायाकडे शाश्वत उत्पादनाच्या दृष्टिकोनातून बघायला लावणे व पोल्ट्री व्यवसाय हा शेती पूरक व्यवसाय नाही तर स्वतंत्र व्यवसाय म्हणून उदयास आणणे हे आमचे ध्येय आहे. +917821096859.

कुकूटपालनच का ?

शेतकऱ्यांचे घर म्हटले की पशुसंगोपन आलेच मुख्यतः गाई, म्हशी, शेळ्या अणि कुक्कुट पालन हे घरो घरी सांभाळून त्यातून शेतीला पूरक अर्थार्जन देतात.
या पैकी कुक्कुट पालन हा अतिशय सोप्पा कमी खर्चात कमी जागेत अणि कमी कष्टात करण्यासारखा व्यवसाय.

त्यातल्या त्यात, ब्रॉयलर पेक्षा गावरान कोंबडी पालन किंवा परसातील कुक्कुटपालन या विषयांमध्ये पशुपालक मित्रांनी भरपूर उत्साह दाखवला आहे. यात नियमित उत्पन्न देणारा गावरान अंडी उत्पादन हा उपव्यवसाय किंवा जोडधंदा देखील भरपूर चर्चेत आहे. अनेक शेतकरी या विषयी माहिती विचारत आहेत त्यांच्यासाठी ही माहिती आहे.आज कमी कालावधि मधे तयार होणाऱ्या गावरान क्रॉस ब्रीड्स उपलब्ध आहेत त्यापैकी एक म्हणजे पॅराडाईज गावरान.

शेळी पालनाच्या खालोखाल चांगली संधी असलेला आणि बर्‍याच मोठ्या प्रमाणावर रूढ झालेला शेतीला पूरक असा उद्योग म्हणजे कुक्कुटपालन किंवा कोंबडी पालन. त्यालाच व्यवहारामध्ये पोल्ट्री फार्म असे म्हणतात. शेळी पालन व्यवसायाप्रमाणेच कोंबडी पालनाचा व्यवसाय सुद्धा कोंबड्या मोकळ्या सोडून किंवा पिंजर्‍यात बंद करून अशा दोन्ही पद्धतीने करता येतो. मोकळ्या कोंबड्या साधारणपणे देशी वाणाच्या, गावरान असतात. त्या मोकळ्या सोडल्यामुळे मांजरासारखे प्राणी किंवा घार, गिधाड असे पक्षी यापासून त्यांना धोका असतो. परंतु गावरान कोंबड्यांमध्ये त्यांच्यापासून स्वत:चे संरक्षण करण्याची क्षमता असते. त्यामुळे गावरान कोंबड्या मोकाट सोडल्या तरी चालतात. घरच्या परसामध्ये किंवा अंगणात, घराच्या आसपास अशा दहा-वीस कोंबड्या पाळल्या की, त्या स्वत:चे अन्न स्वत: शोधून खातात. दहा माद्यांमागे एखादा कोंबडा असला की, कोंबडींना पिलेही होतात आणि त्यांची पैदास वाढत राहते. कोंबडी पालनामध्ये व्हाईट लेगहार्न किंवा अन्य काही नवनव्या जातींच्या कोंबड्या मात्र मोकाटपणे पाळता येत नाहीत. त्यांच्यासाठी पिंजरा तयार करावा लागतो. कारण या कोंबड्यांमध्ये स्वत:चे संरक्षण करण्याची क्षमता नसते. जर्सी गायींप्रमाणेच या सुधारित जातीच्या कोंबड्या प्रकृतीने नाजूक मात्र जास्त अंडी देणार्‍या असतात. त्यांची काळजी घ्यावी लागते, वेळेवर औषधपाणी करावे लागते. पण एवढी काळजी घेतली की, त्या भरपूर अंडी देतात.

कदाचित आपल्याला कल्पना सुद्धा येणार नाही. कारण आपल्या देशामध्ये काही शेतकरी हा व्यवसाय १००-२०० कोंबड्या पाळून करत असतात. काही सहकारी संस्था या क्षेत्रात उतरलेल्या आहेत आणि त्या दहा हजार ते वीस हजार कोंबड्या पाळत असतात. परंतु आंध्र प्रदेशामध्ये विशेषत: हैदराबादच्या परिसरात कोंबडी पालनाचा व्यवसाय करणारे कोंबडीपालक लाख लाख कोंबड्या पाळत असतात आणि काही अरबी देशांमध्ये तर दहा-दहा लाख कोंबड्या पाळणारे कोंबडी पालक आहेत. तेव्हा हा व्यवसाय किती मोठा करता येतो याची यावरून कल्पना येईल.

गावठी कोंबड्यांमध्ये सुरवातीचे चार आठवडे पिल्लांना जपावे. पिल्ले आकाराने व वजनाने कमी (25 ते 27 ग्रॅम) असतील, तर सुरवातीच्या काळात कृत्रिमरीत्या पुरविण्यात येणारी ऊब कमी पडू देऊ नये. नाही तर पिल्लांमध्ये मरतूक होते. खासकरून नदीप्रवाहाच्या जवळचा भाग किंवा जास्त थंड हवेच्या ठिकाणी वीजकपातीच्या कालावधीमध्ये मरतुकीचे प्रमाण 50 टक्के अधिक असते. शेतकरी यावर उपाय म्हणून पेट्रोमॅक्‍सच्या साह्याने उष्णता देण्याचा प्रयत्न करतात; परंतु एकंदरीत सर्व विचार केला तरी 10 ते 15 टक्के मर पिल्लांमध्ये निश्‍चितच धरावी लागते. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे या कोंबड्या बंदिस्त पद्धतीने पाळताना, त्यांना देण्यात येणारी जागा, खाद्य, पाणी अपुरे पडल्यास कोंबड्यांमध्ये मूलतः असलेल्या विकृतीला चालना मिळते.

शेडमध्ये प्रखर प्रकाश किंवा कोंबड्यांची गर्दी जास्त असल्यास कोंबड्या एकमेकांची पिसे उपटतात. काही वेळा एकमेकांना घायाळही करतात. यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे. यासाठी पिल्ले 10 ते 12 दिवसांची असताना एकदा व त्यानंतर एक ते दीड महिने वयाच्या कालावधीत चोची बोथट करणे आवश्‍यक आहे. असे केल्यास, बोचण्याचे प्रमाण कमी होते. कोंबडीघरात वायुविजन चांगले असणे आवश्‍यक आहे. वाढीच्या कालावधीत प्रखर उजेड येणार नाही, खाद्याची भांडी बराच काळ रिकामी राहणार नाहीत याची काळजी घेऊन योग्य व्यवस्थापन असल्यास या विकृतीवर पूर्णपणे मात करता येते. या प्रमाणात कोंबड्या पाळताना गॅस ब्रुडरचा वापर करणे व्यापारी तत्त्वावर अधिक योग्य होईल.

पॅराडाईज पोल्ट्री फार्म चाच पक्षी का . . ?

  • अल्पावधीतच ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले आणि नावाजलेले पॅराडाईज गावरान पक्षी . . . 
  • संपूर्णपणे निरोगी एक दिवसाचे पक्षांचीच निवड केली जाते . सर्व पक्षांचे योग्यरीत्या ३ वेळा लसिकरण केले जाते . 
  • सर्व पक्षांना पहील्यापासून शेवटपर्यंत चांगल्या ब्रँडेड कंपनीचेच खादय दिले जाते . 
  • सर्व पक्षांना खादय पाणी वेळापत्रकानुसारच दिले जाते व ते काटेकोरपणे पाळले जाते . 
  • वेळोवेळी तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन घेतले जाते .  
  • या सर्व कारणांमुळेच पॅराडाईज पोल्ट्री फार्म चा पक्षी निरोगी तयार होतो व त्याचे गावरान चिकन चवीला चांगले लागते .

Amenities

Free consultation
Cash And Online Payment

Send a Message

An email will be sent to the owner

Areas Covered

Daryapur

Opening Hours

Sunday

-

-

Monday

-

-

Tuesday

-

-

Wednesday

-

-

Thursday

-

-

Friday

-

-

Saturday

-

-